दिवाळीची खरेदी फक्त हिंदूकडूनच करा. दिवाळी खरेदीचा नफा फक्त हिंदूंनाच मिळायला हवा.असं वक्तव्य आमदार संग्राम जगतापांनी केलंय.पंढरपूरच्या करमाळा इथल्या हिंदू आक्रोश मोर्चात त्यांनी हे वक्तव्य केलंय.त्याचबरोबर सध्या हिंदूंवर होणारे हल्ले हे मशीदीतून घडतायत,असं वादग्रस्त वक्तव्यही त्यांनी केलंय.करमाळा येथे हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये आमदार संग्राम जगताप, आमदार अमोल खताळ हे उपस्थित होते. भव्य अशा निघालेल्या मोर्च्यात फुलांचीही उधळण करण्यात आली. यावेळीच दिवाळीत केवळ हिंदूंकडून खरेदी करा. असे अजब आवाहन आमदार जगताप यांनी केले.