छत्रपती संभाजीनगरमध्ये आता रिक्षांमध्ये भरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. संभाजीनगरच्या बीड बायपासवर असलेल्या एका पेट्रोल पंपावर किमान अडीच ते तीन किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. काल रात्रीपासून या रांगा पाहायला मिळत आहे. शेवटच्या रिक्षा चालकाचा नंबर येण्यासाठी किमान दोन ते अडीच तास वेळ लागत आहे.