राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ छत्रपती संभाजीनगर येथील रेल्वे स्थानकावर काँग्रेसकडून अचानक आंदोलन सुरू करण्यात आले आहे. युवक काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन केले जात आहे. राहुल गांधींकडून दिल्ली येथे करण्यात आलेल्या आंदोलनात पोलिसांकडून त्यांना ताब्यात घेण्यात आलं.. या घटनेच्या निषेधार्थ हे आंदोलन केले जात आहे. तसेच निवडणूक आयोगाकडून मतांची चोरी केली जात असल्याचा आरोप आणि त्याविरोधात काँग्रेस युवकचे पदाधिकारी यांच्याकडून रेल रोको आंदोलन केले जात आहे. तर यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते अचानक रेल्वे रुळावर उतरल्याने रेल्वे थांबवण्यात आली आहे. यावेळी रेल्वे पोलीस याठिकाणी पोहचले असून, काँग्रेस कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहे.