मतदारयादीतल्या घोळाची चर्चा देशभरात होत असताना आता त्यामध्ये महाराष्ट्रातला एक गोंधळ समोर आला.पालघर जिल्ह्यातल्या सुषमा गुप्ता नावाच्या महिलेचं नाव मतदारयादीत सहा वेळा आलंय.तिचा पत्ता आहे नालासोपाऱ्यातली जीवदानी चाळ हा घोळ समोर आल्यानंतर सगळे राजकीय पक्ष या सुषमा गुप्ताला शोधतायत. तर दुसरीकडे राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांनीही या मतदारयादीच्या घोळावर प्रतिक्रिया दिली.