Sankalp Pratishthan| 20 वर्ष परंपरेची, 20 वर्ष अभिमानाची साजरी करूया दहीहंडी संकल्प प्रतिष्ठानची

'वीस वर्ष परंपरेची आणि 20 वर्ष अभिमानाची, साजरी करूया दहीहंडी संकल्प प्रतिष्ठानची' अशा घोषवाक्यांमध्ये संकल्प प्रतिष्ठानने दहीहंडी उत्सव आयोजित केलाय. संकल्प दहीहंडी उत्सव 2025 चं यंदाचं हे विसावं वर्ष आहे. ठाण्यातील शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक यांनी हा संकल्प दहीहंडी उत्सव आयोजित केलाय. त्याचबरोबर जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास रोख 21 लाखांचं पारितोषिक देण्यात येणार आहे. ठाणे आणि मुंबई उपनगरात सर्वप्रथम जे गोविंदा पथक संकल्प प्रतिष्ठान ठाणेतर्फे आयोजित दहिहंडी उत्सवाच्या ठिकाणी येऊन ९ थर लावेल आणि सलामी देईल, त्या पथकाला 11 लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे. तसंच 9 थर लावणाऱ्या पथकासही लाखोंची बक्षिसं देण्यात येणार आहे. या भव्यदिव्य दहीहंडी कार्यक्रमात एकूण 3 हंड्यांचा थरार पाहता येणार आहे. एक हंडी ठाण्यातील पथकांसाठी तर दुसरी दहीहंडी मुंबईतील पथकांसाठी असून तिसरी हंडी ही विशेष मुंबई - ठाणे येथील महिला दहीहंडी पथकांसाठी असेल.

संबंधित व्हिडीओ