शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार निलेश वाघमारेला चार महिन्यांनंतर अटक.. बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रदान करून नियमबाह्य पद्धतीने वेतनास पात्र नसलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन अदा केल्याच्या आरोपाखाली वेतन अधीक्षक नीलेश वाघमारे याला एप्रिल महिन्यात निलंबित करण्यात आले होते. परंतु, चौकशी अहवालात वाघमारे दोषी आढळल्यानंतर तो फरार होता. अखेर चार महिन्यांनंतर पोलिसांनी त्याला अटक केले आहे..