कफ सिरममुळे मध्य प्रदेशात 14 चिमुरड्यांचा मृत्यू झाला.. त्याप्रकरणी मध्य प्रदेश सरकारने आता मोठी कारवाई केलीय. छिंदवाडा पोलिसांनी आरोपी डॉक्टर प्रवीण सोनीला अटक केलीय. डॉ.प्रवीण सोनीवर विषारी सिरपचं प्रिस्क्रिप्शन दिल्याचा आरोप करण्यात आलाय. विषारी कप सिरपचं प्रिस्क्रिप्शन दिल्याप्रकरणी आरोग्य विभागाचे बीएमओ अंकित यांनी तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी डॉ.सोनी आणि श्रीसन कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विषारी कप सिरपवर आता मध्य प्रदेशपाठोपाठ, राजस्थान, केरळ तामिळनाडूमध्येही बंदी घालण्यात आलीय..त्यानंतर नागपुरातही प्रशासन अलर्ट मोडवर आलाय.. नागपुरातल्या एका औषध विक्रेत्याकडे असलेल्या कफ सीरपवर प्रशासनाला संशय आहे. त्यामुळे स्टॉकमध्ये असलेलं कफ सिरप विक्री थांबवण्याची सूचना प्रशासनाने केलीय... कफ सिरपमुळे लहान मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप होत असतानाच आता केंद्र सरकारने आपत्कालीन बैठक बोलावलीय.. केंद्रीय आरोग्य सचिवांनी दुपारी 4 वाजता ही बैठक बोलावलीय. सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांची तसंच औषध नियंत्रकांची ही बैठक आहे.कफ सिरपसंदर्भात माहिती घेतली आमच्या प्रतिनिधी निहारिका सिंह .