ढोंगीबाबा अशोक खरातचे कारनामे समोर आल्यानंतर केवळ राजकीय नेतेच नाही तर.. प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही धक्का बसलाय.. खरातचे सरकारी अधिकाऱ्यांशी आर्थिक व्यवहार असल्याचे आरोप सातत्याने होत आहेत. त्यातच आता एका जमीन व्यवहारामुळे उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे-पाटील यांचे नाव चर्चेत आलंय.. यामुळे अभिजीत भांडेंची बदलीही करण्यात आलीय.पाथर्डीमधील एका जमीन व्यवहारात खरातची मुलगी आणि उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडेंची पत्नी प्रीती भांडे भागीदार असल्याचं समोर आलंय.. आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या जमीन व्यवहाराचा नोंदणीकृत दस्तऐवज सार्वजनिक केला. त्यानंतर उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.