मुख्यमंत्री फडणवीस आज बीडमधल्या आष्टीमध्ये होते.तिथे उपस्थित असलेल्या सुरेश धस, पंकजा मुंडे यांनी फडणवीसांवर भरभरुन स्तुतीसुमनं उधळली.फडणवीस बाहुबली आहेत, मेरे पास फडणवीस है अशी जोरदार डायलॉगबाजी झाली. भाजपच्या नेत्यांकडून हे अपेक्षितच आहे.मात्र सध्या विरोधकांच्या तोंडीही फडणवीसांबद्दल कौतुक वाढलंय.ठाकरे गोड बोलतायत, पवार कौतुक करतायत.भुजबळांनी फडणवीसांच्या भेटी वाढवल्यायत.आणखी महत्त्वाचं म्हणजे खडसेंनीही फडणवीसांची भेट घेतलीय असं अचानक का घडतंय.महाराष्ट्राच्या राजकारणात काय बदललंय.