लाडकी बहिण योजनेच्या संदर्भात शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.तो म्हणजे ज्या घरामध्ये चार चाकी वाहन असेल अथवा जे कुटुंब सधन असेल त्या कुटुंबातील महिलांना लाडक्या बहीण योजनेअंतर्गत येणारे अनुदान हे बंद होणार आहे.आणि याबाबतीत सर्वेक्षण करण्याकरिता अंगणवाडी पर्यवेक्षिका यांना घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचा आदेश देण्यात आले आहे.मात्र अशा कोणत्या सूचना अद्याप आम्हाला मिळाल्या नसल्याची माहिती एकात्मिक बाल विकास केंद्राचे अधिकारी देताहेत या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी.