मागील काही दिवसांमध्ये पुण्याच्या परिसरामध्ये अवैधरित्या बांगलादेशी नागरिकांचे वास्तव्य होत असल्याचे आढळून आले होते.त्यातच आता पुणे शहराजवळील केसनंद गावामध्ये दफनभूमीच्या जागेवर अनधिकृत पणे मज्जित उभारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.आज नितेश राणे यांनी येथील विभागात भेट देऊन याची पाहणी केली यावेळी त्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.यासोबतच आम्ही येत्या काळात असे प्रकार खपवून घेणार नाही अशी तंबीच भरली.