स्वीडनचे राजे गुस्ताफ सोळावे आणि राणी सिल्व्हिया यांनीही मृतांना आदरांजली वाहिली. शाळेजवळच पार पडलेल्या एका कार्यक्रमात दोघेही सहभागी झाले होते. पुष्प अर्पण करून त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. तर पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांनीही घटनास्थळी दाखल होत आदरांजली वाहिली.