सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशीही मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळतं.आज सोन्याच्या भावात 1 हजार 500 रुपयांची वाढ झाली आहे.तर गेल्या 48 तासात सोन्याच्या भावात 2 हजार 500 रुपयांची वाढ झाली असून जळगाव सुवर्णनगरीत आज सोन्याचा भाव 85 हजार रुपये तर जीएसटीसह सोन्याचे भाव 87 हजार 550 रूपयांवर पोहोचला आहे.सोन्याच्या पाठोपाठ चांदीच्या दराने ही एक लाखाचा टप्पा गाठला असून याबाबत जळगाव सुवर्णनगरीतून आढावा घेत सराफा व्यावसायिकांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी..