अमेरिकेच्या ओहायोमध्ये एका गोदामावर गोळीबार झाला. यात एकाचा मृत्यू झालाय.तर पाचजण जखमी झालेत. जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं.सौंदर्य प्रसाधनांचं हे गोदाम आहे. मंगळवारी रात्री अकराच्या आसपास ही घटना घडली. सौंदर्य प्रसाधनांच्या गोदामाजवळ हा गोळीबार झालाय. मात्र हा गोळीबार का आणि कुणी केला याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. हल्लेखोर घटनेनंतर पसार झालाय त्याचा शोध घेतला जातोय. तर गोदामाजवळच एक बंदुक मिळाली. मात्र हा गोळीबार ठराविक व्यक्तीवर करण्यासाठी झाला त्यामुळे या गोळीबाराचा स्थानिकांना कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा पोलिसांनी दिलाय.