मनसे अध्यक्ष राज ठाकरे 7 फेब्रुवारीला पंढरपूर दौऱ्यावर जाणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे यांचा पहिलाच पश्चिम महाराष्ट्रातील दौरा आहे.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने राज ठाकरे यांचा पंढरपूर दौरा महत्वपुर्ण समजला जातो. राज ठाकरे ग्रामीण भागातील पदाधिकारी यांच्या गाठीभेटी घेणार आहेत.