सांगोला येथे शिवसेनेच्या मेळाव्यात शहाजी बापू पाटील यांनी अशोक खरातवर गंभीर आरोप केले.. खरातने सांगोल्यात धिंगाणा करून घातलेल्या पूजेचा समावेश आहे का? असा सवाल शहाजीबापूंनी दीपाली सय्यद यांना उद्देशून केलाय. यावेळी त्यांनी सांगोल्यातील काही जुन्या घटनांचाही उल्लेख केला.
तसेच माजी आमदार दीपक साळुंखे यांनाही त्यांनी टोला लगावला. मेळाव्यास मंत्री भरत गोगावले, मंत्री योगेश कदम आणि दीपाली सय्यद उपस्थित होत्या.