वसई-विरार पालिकेतील बांधकाम घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यासह १८ जणांविरुद्ध ईडीने ३४१ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. भ्रष्टाचारासाठी यंत्रणा उभारल्याचा, लाचेच्या पैशांतून महागड्या वस्तू खरेदी केल्याचा आणि धक्कादायक 'रेट कार्ड'चा खुलासा या आरोपपत्रातून झाला आहे.