ठाणेकरांच्या विविध समस्यांसाठी मनसे आणि ठाकरे गटाने आज संयुक्त मोर्चा काढला आहे. गडकरी रंगायतन येथून दुपारी ३ वाजता मोर्चाला सुरुवात होईल आणि तो ठाणे महापालिकेपर्यंत जाईल. वाहतूक कोंडी, भ्रष्ट अधिकारी, अपुरा पाणीपुरवठा आणि वसूलखोरी यांसारख्या अनेक मुद्द्यांवरून हा निषेध व्यक्त केला जाणार आहे.