पश्चिम बंगालमधील बर्धमान रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरीची घटना घडलीय.या दुर्घटनेत किमान 12 जण जखमी झाले आहेत. प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाल्याने अचानक गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. प.बंगालमधील बर्धमान रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरी