एकनाथ शिंदे संघटनात्मक पातळीवर भाकरी फिरवणार असल्याचे संकेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिलेत.शिवसेनेत आता मोठे संघटनात्मक बदल होणार आहेत.. निष्क्रीय आणि काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदावरून हटवलं जाणार आहे.तर राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचं प्रगती पुस्तक 15 दिवसात तयार होणार आहे त्याचबरोबर सर्व मंत्र्यांच्या कामगिरीवरही लक्ष ठेवलं जात आहे, असं उदय सामंत यांनी म्हटलं.