इराणने ठेवलेल्या प्रमुख अटींपैकी एका अटीचं उल्लंघन केल्याने इराण पुन्हा आक्रमक झालाय... लेबनॉन आणि गाझापट्टीत कोणतीही सैन्य कारवाई करु नये, अशी स्पष्ट अट इराणने युद्धबंदी करताना ठेवली होती.. मात्र, इस्त्रायलकडून लेबनॉनवरील हल्ले सुरुच राहिल्याने इराणने पुन्हा हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इस्त्रायले हल्ले बंद न केल्यास होर्मुझची खाडी खुली करणार नाही असंही इराणने स्पष्ट केलंय