पाकिस्तानच्या मध्यस्थीनंतर अमेरिका-इराण युद्ध थांबलं, हे वास्तव आहे..... त्यासाठी दोन्ही देशांनी जाहीरपणे पाकिस्तानचे आभारही मानलेत... मात्र त्यावरुन भारतात राजकीय फटाके फुटायला सुरुवात झालीय... ठाकरेंच्या सेनेनं पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय....या युद्ध काळात पंतप्रधान मोदी टेलिफोन ऑपरेटरचं काम करत होते, असं म्हणत संजय राऊतांनी टीका केलीय... तर ज्या पक्षाची मजल उरणपर्यंतसुद्धा नाही, त्या पक्षानं इराणवर बोलू नये, असं प्रत्युत्तर भाजपनं दिलंय.... पाकिस्तानच्या मध्यस्थीमुळे हे युद्ध शमलं हे जरी खरं असलं तरी पाकिस्तानचा मोठा स्वार्थ यामागे आहे... पाकिस्ताननं मध्यस्थी केली नसती तर युद्ध भडकलं असतं आणि त्यामध्ये सगळ्यात वाट पाकिस्तानचीच लागली असती.... पाहुया याचसंदर्भातला स्पेशल रिपोर्ट....