गुजरातमधल्या अहमदाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय.... एका कुटुंबातून बाजारातून डोशाचं तयार पीठ आणलं... त्याचे डोसे केले आणि कुटुंबातल्या तिघांनी डोसे खाल्ले.... त्यानंतर तिघांचीही तब्येत बिघडली.... एवढंच नव्हे तर या कुटुंबामध्ये एक तीन महिन्यांचं बाळ होतं... त्या तीन महिन्यांच्या मुलीनं तर डोसे खाल्ले नव्हते, तरी तिचीही तब्येत बिघडली... आणि पुढच्या काही तासांतच या कुटुंबातल्या दोन्ही मुलींचा मृत्यू झाला... एक चार वर्षांची मुलगी आणि एक तीन महिन्यांची मुलगी दोघीही दगावल्या.. तर त्यांच्या आई वडिलांवर उपचार सुरू आहेत... या कुटुंबाचं म्हणणं आहे... डोसे खाल्ल्यानंतर हा सगळा प्रकार झाला.... पण या सगळ्यामध्ये दोन ट्विस्ट आहेत..... आणि त्यामुळेच इडली, डोसा की मर्डर ? हा प्रश्न विचारण्याची वेळ आलीय