महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेला ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकार वीज दरवाढीचा मोठा शॉक देणार आहे. ऑक्टोबरच्या बिलात प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. घरगुती, व्यावसायिक आणि उद्योग ग्राहक अशा सर्वच ग्राहकांना याचा फटका बसणार आहे. सणासुदीच्या खर्चावर आता या अतिरिक्त भाराची भर पडली आहे.