ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटींचा निधी मंजूर, मिरगावच्या ईशान्येश्वर मंदिरातून Ground Report

अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिराबाबत एक माहिती समोर आलीय.भोंदूंबाबावर महायुती सरकारही मेहरबान असल्याचं पाहायला मिळतंय. खरातच्या ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता.31 मार्च 2018 रोजी जीआर काढण्यात आला असून याची प्रत NDTV मराठीच्या हाती लागलीय. तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. सभामंडप बांधकाम, पेव्हर ब्लॉक बसवणे, महिला व पुरुष प्रसाधनगृह, चेंजिंग रूम, भक्तनिवास बांधकाम, विद्युतीकरण व लैंडस्केपिंग करता निधी मंजूर केल्याची बाब उघडकीस आली आहे. महत्वाचं म्हणजे भक्त निवास बांधकामापेक्षा चेंजिंग रुमसाठी जास्त निधी मंजूर करण्यात आलाय.

संबंधित व्हिडीओ