Global News| मॉस्कोमध्ये India-Russia संबंधांचा नवा अध्याय, एस जयशंकर यांनी घेतली पुतीन यांची भेट

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी आज रशियाचे अध्यक्ष व्हालदमीर पुतीन यांची मॉस्कोमध्ये भेट घेतली. गेल्या तीन दिवसांपासून 26 साव्या भारत-रशिया इंटर गव्हर्नमेंटल परिषदेसाठी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर रशियात आहेत. या परिषदेत दरवर्षीप्रमाणे व्यापार, अर्थकारण, संरक्षण आणि संस्कृती अशा विविध विषयांवर बातचीत करण्यात येते. यंदाही परिषद मॉस्कोमध्ये घेण्यात आली. त्याच परिषदेच्या शेवटच्या टप्प्यात जयशंकर यांनी पुतीन यांची भेट घेतली. यावेळी रशिया कडून कच्च्या तेलाची खरेदी केल्यानं भारतावर अमेरिकेनं लादलेल्या निर्बंधांसह इतर अनेक मु्द्दयांवर चर्चा झाली. दोनच दिवसांपूर्वी पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर बातचीत करुन अल्साकामध्ये अमेरिकेशी झालेल्या चर्चेची माहिती दिली होती. त्यानंतर अगदी काही तासात जयशंकर पुतीन यांची प्रत्यक्ष भेट झाली.

संबंधित व्हिडीओ