शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीचा फटका आज थेट राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या ताफ्यालाही बसला. नियमित वाहतुकीसोबतच पावसामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे आणि रस्त्यावरील संथ गतीमुळे भरणे यांचा ताफा बराच वेळ अडकून पडला. दरम्यान, सामान्य नागरिकांसोबत मंत्र्यांनाही या कोंडीचा सामना करावा लागल्याने पुण्यातील वाहतूक व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.