आधुनिक जगात युद्धाचं तंत्र बदलतंय. आपल्याच हद्दीत राहून शत्रू हद्दीतील जास्तीत जास्त दूरवरचं लक्ष भेदण्याची क्षमता विकसित करण्यावर सगळ्याचं देशांचा भर आहे. तीन महिन्यापूर्वी भारतानं पाकिस्तान विरोधात केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या हद्दीत असताना त्यांची 6 विमानं पाडली. तेही आपल्या हद्दीत असलेल्या S400 एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीमच्या आधारे...आता अशाच प्रकारे तब्बल 5 हजार किलोमीटरवरील लक्ष्य भेदण्याची क्षमता असणारं क्षेपणास्त्र भारताच्या लष्कराच्या ताफ्यात सामील होणार आहे. संपूर्णपणे भारतीय बनावटीचं हे क्षेपणास्त्र हे अग्नि क्षेपणास्त्र मालिकेतील 5 क्षेपणास्त्र आहे...पाहुयात त्याविषयीचा हा खास रिपोर्ट..