कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांची खड्डयांमुळे चाळण झालीय. खड्डे बुजविण्याच्या कामासाठी पालिकेनं 30 कोटी रुपये खर्चाची तरतूद केली होती. काही दिवसांपूर्वीच कल्याण शेड रस्त्यावर खड्ड्यांमुळे एकाचा मृत्यू झालाय. त्यामुळे प्रशासन करतंय असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय.