सोने-चांदीच्या दरांनी आज नवा उच्चांक नोंदवला. शनिवारच्या तुलनेत सोनं विना-जीएसटी १६०० रुपयांनी महागलं, तर चांदी तब्बल २४०० रुपयांनी महागली असून तिचा दर दीड लाखांपार गेला आहे. चांदीचा दर जीएसटीशिवाय १,५०,५०० रुपये प्रति किलो झाला आहे.