यापूर्वी एकाच कार्यक्रमात सर्वाधिक गोविंदा पथकांनी सलामी देण्याचा विक्रम 127 पथकांच्या नावावर होता. 'ग्रो गोविंदा' स्पर्धेत 170 गोविंदा पथकांनी नोंदणी केली आहे. जर यापैकी 128 पथकांनीही एकाच वेळी सलामी दिली, तर एक नवीन विश्वविक्रम प्रस्थापित होईल. ही स्पर्धा मुंबईतील भारतीय क्रीडा मंदिराच्या मैदानावर उद्या (सोमवार) आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून गोविंदा उत्सवाला एक वेगळी ओळख मिळवून देण्याचा आणि सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करत पारंपरिक उत्साहाची जपणूक करण्याचा प्रयत्न केला जात आहे.