NDTV मराठीच्या बातमीचा Impact, 632 शिक्षकांच्या पगाराबाबत निर्णय; वर्षभराचा पगार लवकरात लवकर देणार

बातमी आहे एनडीटीव्ही मराठीच्या बातमीच्या इम्पॅक्टची.शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे गेल्या 14 महिन्यांपासून बंद असलेल्या 632 शिक्षकांच्या पगाराबाबत अखेर निर्णय घेण्यात आलाय.. मे 2026 आणि जून 2026 या दोन महिन्यांचे वेतन तात्काळ देण्यात येणार असल्याचे आदेश कार्यालय अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक विभागाने जारी केले आहेत.. त्यामुळे उर्वरित वर्षभराची पगार लवकरात लवकर देण्यात येणार असल्याची माहिती मिळतीय.. गेल्या 14 महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे अनेक शिक्षकांना डिलिव्हरी बॉय, हॉटेलमध्ये वेटर, किंवा इतर कामे करून उदरनिर्वाह करावा लागत असल्याची बातमी एनडीटीव्ही मराठीने दाखवली होती... त्यानंतर आता असलेल्या 632 शिक्षकांच्या पगाराबाबत अखेर निर्णय घेण्यात आलाय.

संबंधित व्हिडीओ