पंतप्रधान मोदी आज नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे होणाऱ्या तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी झाले.यावेळी त्यांनी नॉर्डिक देशांच्या नेत्यांसोबत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली.ही परिषद भारत आणि उत्तर युरोपीय देशांमधील सहकार्य वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते व्यापार, गुंतवणूक, नवीन तंत्रज्ञान, हवामान बदल आणि जागतिक सुरक्षा यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.हरित ऊर्जा, ब्लू इकॉनॉमी म्हणजे सागरी अर्थव्यवस्था, ग्रीन शिपिंग आणि हवामान तंत्रज्ञान यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं.