बीड मधून संत भगवान बाबाची जन्मभूमी असलेल्या बीडच्या सावरगाव घाट येथे भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याची तयारी सुरू आहे. या ठिकाणी असलेल्या संत भगवान बाबांच्या मूर्तीची रंगरंगोटी करण्यात येते आहे. तर मेळाव्याला येणाऱ्या मुंडे समर्थक आणि भगवान बाबांच्या भक्तांसाठी इथे मैदान तयार करण्यात आलेलं आहे. आणि याचाच आढावा घेतलाय आमचे बीडचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांनी.