विलेपार्लेच्या जैन मंदिरावरील तोडक कारवाईप्रकरणी मुंबई महापालिकेने न्यायालयात शपथपत्र दाखल केलंय. यात जैन मंदिरावरील कारवाई नियमानुसारच झाल्याचं पालिकेनं म्हटलंय.कारवाई ही नियमानुसार आणि संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करूनच केली असं शपथपत्रात नमुद करण्यात आलं.तर दुसरीकडे मंदिरावर तोडक कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याच्या बदलीवर मुंबई महापालिका प्रशासन ठाम आहे. 16 एप्रिल रोजी या मंदिरावर तोड कारवाई करण्यात आली होती. मात्र विश्वस्त मंडळातील पदाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेत या कारवाईवर स्थगिती मिळवली. त्यानंतर या कारवाईच्या निषेधार्थ जैन समाजातील नागरिकांनी मोठा मोर्चा काढला.राजकीय दबाव वाढल्यामुळे के पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त नवनाथ घाडगे यांच्याकडून विभाग कार्यालयाचा पदभार काढून घेण्यात आला. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयात ३० एप्रिल रोजी सुनावणी झाली.सुनावणीत पाडकामावरील स्थगिती ५ मेपर्यंत वाढवण्यात आली.अर्थातच उद्या या स्थगितीचा शेवटचा दिवस असेल.