स्वातंत्र्य दिनी कल्याण डोंबिवलीतील मांसाहारी दुकानं बंद ठेवण्याच्या महापालिकेच्या निर्णयावर आता टीका होतेय. 'हे अती होतंय, लोकांनी कुठल्या दिवशी काय खायचे हे ठरवणारे तुम्ही कोण? ' असा सवाल त्यांनी केलाय...तर असा निर्णय घेणाऱ्या आयुक्तांना निलंबित करा अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केलीय. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिकेने हा निर्णय घेतलाय. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील चिकण शॉप ,मटन शॉप आणि कत्तलखाने बंद राहतील..