#MNS #RajThackeray #MaharashtraPolitics आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) शिष्टमंडळाने आज राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार ही भेट घेण्यात आली असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मतदार यादीच्या संदर्भात शिष्टमंडळाने अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले.