Nepal Flood| नेपाळच्या त्रिशुली-3A बोगद्यातून चमत्कार, नऊ दिवसांनंतर दोन कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका

नेपाळचा पूर हा गेल्या अनेक वर्षांतला भीषण आणि विनाशकारी आहे.तसाच या आपत्तीतही अनेक चमत्कार ही पाहायला मिळाले आहेत.नेपाळमधील विनाशकारी पुराच्या नवव्या दिवशी, रसुवा जिल्ह्यातील त्रिशुली-3ए जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्याच्या ढिगाऱ्याखालून काही जणांना जिवंत बाहेर काढण्यात आलं आहे. जवळपास नऊ दिवसांनंतर दोन जणांना बोगद्यातून जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. इतर बेपत्ता कामगारांचा शोध अजूनही सुरू आहे.पुरावेळी सुमारे ५५७ कर्मचारी बोगद्यात बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली होती.त्यातील ११५ जण अजूनही बोगद्यात अडकल्याचं मानलं जातंय. दरम्यान, आतापर्यंत पुरात 1,259 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आलीय.

संबंधित व्हिडीओ