कल्याणनंतर आता नागपूर शहरातील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 15 ॲागस्टला दरवर्षीप्रमाणे मांस विक्रीवर बंदी असेल असं नागपूर महानगरपालिका स्पष्ट केलं आहे. शासनाच्या जुन्या निर्णयाचा आधार घेत दुकानं बंद राहणार असल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे चिकन आणि मटण विक्रेते पालिकेच्या निर्णयाला विरोध करण्याची शक्यता आहे.