शेतकऱ्याचा मुलगा JEE परिक्षेत अव्वल, नागपूरच्या मुलाने नाव काढलं

बारावीनंतर आयआयटीसारख्या प्रमुख शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेचा (जेईई) निकाल जाहीर झालाय. या परीक्षेत नागपूरचा निलकृष्ण (Nilkrishna Gajre) गजरे हा 100 पर्सेंटाईल मिळवून देशात पहिला आलाय. निलकृष्णचे वडील वाशिम जिल्ह्यात शेती करतात तर आई गृहिणी आहे. सामान्य कुटुंबातील या मुलानं आपल्या ध्येयावर फोकस ठेवत हे मोठं यश मिळवलंय. निलकृष्णनं 'NDTV मराठी' शी बोलताना या यशाचं गुपित सांगितलंय.

संबंधित व्हिडीओ