भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणी अपडेट समोर येतेय...माजी आमदार नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलीस शैलेश पाटील यांना शोधण्यासाठी पडघा पोलिसांचे तीन पथकं रवाना झालीयेत... माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासोबत आरोपी शैलेश पाटीलविरोधात यापूर्वीही गंभीर गुन्हे आहेत... स्वतःच्या आईला पिस्तूलाचा धाक दाखवल्याचा आरोप शैलेश पाटीलवर आहे.तसंच 2014 मध्ये परदेशी महिलेच्या फसवणूक-विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता,सध्याच्या बलात्काराच्या गुन्ह्यानंतर दोन्ही आरोपी फरार असून पोलिसांचा शोध सुरू आहे.यावरूनच ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. विरोधी पक्षातील कोणत्याही नेत्यावर छोटा गुन्हा दाखल झाला तरी सत्ताधारी पक्षाचे नेते आणि प्रवक्ते आक्रमक होतात, तसेच मीडिया ट्रायल सुरू होते. मात्र नरेंद्र पवार यांच्यावरील गंभीर गुन्ह्यानंतरही त्यांना संरक्षण दिलं जात असल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला.
Narendra Pawar is being shielded because he belongs to the BJP; when will Pawar be arrested? Varun Sardesai asks.