नाशिकच्या ईगतपुरीतील रेनफॉरेस्ट रिसॉर्टवर मुंबईच्या CBI पथकाचा छापा.रिसोर्टमध्ये भाड्याच्या जागेत सुरू असलेले बेकायदेशीर कॉल सेंटरचे रॅकेट CBI ने उद्ध्वस्त करत 5 आरोपींना केली अटक.44 लॅपटॉप, 71 मोबाईल फोन आणि इतर गुन्हेगारी डिजिटल पुरावे तसेच 1.20 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड, 500 ग्रॅम सोने आणि एक कोटी रुपयांच्या 7 लक्झरी कार केल्या जप्त.मुंबईतील रहिवासी असलेले 6 आरोपी, अज्ञात खाजगी व्यक्ती आणि बँक अधिकाऱ्यांविरुद्ध सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल