NDTV Marathi Special Report| सुरेश धसांनी बीडमध्ये नेमकं काय करण्याचा प्रयत्न केला?

बीडमधल्या संतोष देशमुख प्रकरणाला आता जातीय वळण लागल्याची चर्चा सुरू झालीय.खरं तर मराठा समाजाचे संतोष देशमुख यांची हत्या होणं आणि वंजारी समाजाचे वाल्मिक कराड हे प्रमुख आरोपी असणं यामुळे या प्रकरणात आधीपासूनच जातीय गणितं मांडली जात होती.मात्र सुरेश धस यांनी या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या विरोधात आघाडी उघडल्याने या प्रकरणात जातीय गणितांसोबतच राजकीय गणितंही मांडली जाऊ लागली. पण आता सुरेश धस यांनी एकाच वेळी मनोज जरांगे आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीगाठी घेतल्याने आता मराठवाड्यातील आणि विशेषत बीडमधील मराठा नेतृत्वाची कमान भाजप नेत्याच्या हातात आणण्याचा प्रयत्न या प्रकरणाच्या निमित्ताने झाला का अशी चर्चा सुरू झालीय.सुरेश धसांनी बीडमध्ये नेमकं काय करण्याचा प्रयत्न केलाय पाहूयात या रिपोर्टमधून

संबंधित व्हिडीओ