स्वातंत्र्य दिनी Kalyan Dombivli तील मांसाहारी दुकानं बंद राहणार,पालिकेच्या निर्णयावर विरोधक संतापले

स्वातंत्र्य दिनी कल्याण डोंबिवलीतील सर्व मांसाहारी दुकाने बंद राहणार आहेत. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली पालिकेने हा निर्णय घेतलाय. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील चिकण शॉप ,मटन शॉप आणि कत्तलखाने बंद राहतील.. मात्र याला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतलाय. हे अती होतंय, लोकांनी कुठल्या दिवशी काय खायचे हे ठरवणारे तुम्ही कोण? असा सवाल त्यांनी केलाय...तर आयुक्तांना निलंबित करा अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केलीय.

संबंधित व्हिडीओ