अतिवृष्टीमुळे खरीप कांद्याचे नुकसान झाले असले तरी, निर्यात ठप्प झाल्याने कांदा चाळीत साठवणूक केलेला कांदा बाजारात उपलब्ध होणार आहे. यामुळे पुढील दोन महिने कांद्याचे भाव स्थिर राहतील आणि दिवाळीत नागरिकांना स्वस्त दरात कांदा मिळेल.