पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यात कुंडेश्वर मंदिरात दर्शनासाठी निघालेल्या महिलांच्या पिकअप व्हॅनला अपघात होऊन 10 महिलांचा मृत्यू झाला, तर 29 जणी जखमी झाल्या आहेत. हा अपघात सोमवारी दुपारी घडला. भाजीपाला वाहून नेणाऱ्या या व्हॅनमध्ये एकाही प्रवाशाला परवानगी नसताना 39 महिलांना कोंबण्यात आले होते. घाटातील नागमोडी वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने व्हॅन 30 फूट खोल दरीत कोसळली. या व्हॅनमधील सर्व मृत आणि जखमी महिला पापळवाडी गावातील रहिवासी होत्या.