पुणे पुन्हा दहशतवाद्यांच्या रडारवर आलंय का? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय. कारण दहशतवाद विरोधी पथक आणि पुणे पोलिसांनी कोंढव्यात सर्वात मोठी कारवाई केलीय. तब्बल 25 सोसायट्यांमध्ये झडती घेत 18 संशयितांची चौकशी करण्यात आलीय. या संपूर्ण मोहिमेत सुमारे 200 एटीएस अधिकारी आणि 500 पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. या कारवाईत लॅपटॉप, मोबाईल, सिम कार्ड आणि कागदपत्रे जप्त जप्त करण्यात आली. यापूर्वी पुण्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ATS ने केलेल्या या कारवाईला अधिक महत्व प्राप्त झालंय. महत्वाची बाब म्हणजे ज्या भागात ही कारवाई झाली, तिथे I LOVE मोहम्मदचे बॅनही झळकले होते. त्यामुळे या कारवाईवरुन राजकारणही रंगलंय... कोंढव्यात मध्यरात्रीपासून नेमकं काय घडतंय? जाणून घेण्यासाठी पाहूया हा खास रिपोर्ट