गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असताना पुणेकरांनी आज रविवार सुट्टीचा मुहूर्त साधत खरेदीसाठी गर्दी केली. गणेशोत्सव आणि गौरी पूजनासाठी लागणाऱ्या साहित्य आणि सजावटीच्या वस्तूंसाठी पुण्यातील मंडई मार्केटमध्ये मोठी गर्दी केली. सजावटीसाठी लागणारी फुलं, देखाव्यासाठी लागणारे झुंबर आणि देवघरे यासह पूजेचे संपूर्ण साहित्य या सगळ्या गोष्टीच्या खरेदीसाठी या मंडई मार्केटमध्ये पुणेकर येत असतात.. याच मंडई मार्केटमधून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी.