मुंबई आणि उपनगरातल्या पावसाची हवामान विभागानं मुंबईसह रायगड रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. मुंबईसाठी red alert देण्यात आलेला आहे तर सातारा आणि कोल्हापुरात पावसाचा red alert दिलेला आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा तिथे पडण्याची शक्यताही वर्तवली आहे. याशिवाय पुण्यासह कोकणाला orange alert देण्यात आलाय. मुंबईमध्ये सकाळपासून पाऊस जरी नसला तरी ढगाळ वातावरण कायम आहे.