राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे चित्रपटासाठी राणीला पुरस्कार मिळाला.पुरस्कार मिळाल्यानंतर राणी साईबाबा चरणी लीन झाली. 2023 मध्ये मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे चित्रपटाच्या प्रदर्शनापुर्वीही राणी मुखर्जीने शिर्डीत साईबाबांना साकडं घातलं होतं. त्यानंतर पुरस्कार मिळाल्यावर ती पुन्हा साईदर्शनासाठी शिर्डीत दाखल झाली.साईंच्या आशिर्वादाने हे यश मिळाल्याची प्रतिक्रिया राणीने दिली.